Saturday, November 16, 2013

Complete Story

 निशब्द    
  
भाग १   
  
मोबाइलची रिंग वाजली, सतिषची झोप मोड झाली त्याने डोळे किलकिले करून बघितले, जोसेफ चा मेसेज होता. मोबाइल आडवा तीडवा करून त्याने परत ठेऊन दिला. काही वेळाने परत रिंग वाजली, या वेळेस मात्र कॉल येत होता. सतीश ने नामुष्कीने मोबाइल उचलला आणि कानाला लावला.   
"काय रे गाढवा किती वेळ झोपला आहेस.", तीकडून प्रितीश बोलला.   
"अरे काय आहे यार सकाळी सकाळी, आज सुट्टीचा दिवस आहे.", सतीश वैतागून बोलला.   
"वा बेटा, सुटीच्या दिवशी कार्यक्रम तुम्ही आखायचे आणि स्वताह झोपून राहायचे.", प्रितीश.   
कार्यक्रम वरुन सतीश ला आठावू लागले की एका आठवड्या पूर्वीच आपण तासवनला जायचा कार्यक्रम आखला होता.   
"अरे यार मस्करी करतोय मला माहीत आहे सगळ, मी आता तयारीच करत होतो.", सतीश प्रितीश ला मस्करीच्या सुरात सांगू लागला.   
"हो हो! मला ते माहितीच आहे बेटा, जोसेफ आता तुझ्या घरीच येतो आहे तेव्हा त्याला हे सांग हा", प्रितीश.   
"काय जोसेफ आला सुधा?", सतीश.   
"अरे मेसेज करून काही रिप्लाय नाही तुझा, तेव्हा मीच त्याला सांगितले की तू डायरेक्ट घरी जा आणि त्याला उचल तिथून  हा...हा..., आता कस", प्रितीश हसू लागला.   
" मेलो!" म्हणून सतीशने फोन ठेवून दिला आणि तयारी ला लागला. इतक्यात जोसेफ घरी आलसुधा.   
"काय रे तुला काही लाज शरम, आज आपला प्रोग्रॅम काय आहे माहीत आहे ना?" जोसेफ घरात येत बोलला.   
"अरे हे काय मी तयरीच करतो आहे." सतीश.   
"अबे साल्या मेसेज तरी वाचलेस का आमचे?" जोसेफ.   
"हो बघितले ना", सतीश.   
जोसेफ ने सतीश चा फोन घेऊन बघितले आणि बोलला, "५ अनरिड मेसेज".   
"अरे म्हणजे मेसेज आले हे बघितले." सतीश फिदी फिदी हसत बोलला.   
"तू चल तुला तासवनात गेल्यावर बघतो.", जोसेफ मूठ अवळत बोलला आणि सतीश ने बाथरूम मधे धूम ठोकली  
तेवढ्यात सतिशची आई बाहेर आली आणि जोसेफला चहा दिला.   
"आज कुठे दौरा आहे तुमचा?" सतिशच्या आईने विचारले.   
"आज आम्ही तासवनला चाललो आहोत मावशी.", जोसेफ.   
"बर पण सांभाळून जा आणि लवकर घरी या.",सतीशची आई बोलली.   
"हो मावशी तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही लवकर घरी येऊ.", जोसेफ.   
पन्धरा मिनिटात सतीश ने आवरून घेतले आणि बाहेर आला. जोसेफ ने तोपर्यंत चहा संपवला होता. सतिष्चया आईने कही खायचे सामान त्याच्या ब्यागेत भरून ठेवले होते.   
"चला निघूया", सतीश.   
"हो चल, आधी प्रितीश कडे जाउ त्यानंतर विश्राम ला पिक करू त्याच्या घरून.", जोसेफ.   
"हो चालेल.", सतीश.   
जोसेफ ने त्याची मारुती गाडी आणली होती. जोसेफ व सतीश दोघेही आईचा निरोप घेउन गाडीत बसले.   
प्रितीश आणि विश्राम ची घरे जवळच होती. अर्ध्या अर्ध्या तासात दोघांनाही पीक करून सर्वजण तासवनच्या वाटेला लागले. जोसेफ आणि सतीश गाडीच्या पुढच्या सीटवर तर विश्राम आणि प्रितीश मागे असे बसले होते. थट्टा मस्करी करत मजेत चौघेही जाऊ लागले.   
तासवन तसे शहरापासून दीड ते दोन तासाच्या अंतरावर असल्याने तासवनला जाण्याचे प्रोग्रॅम आधून मधून ठरतच असत.   
तसेच निसर्गाची आवड चौघंनाही असल्याने तासवन हे नेहमीच त्यांचे आकर्षणाचे ठिकाण राहीले होते. शहराच्या सिमेलगत काही अंतरावर तासवन हे ठिकाण, तासवनच्या मध्यभागी एक मोठा गोलाकृती तलाव होता. तलवा भोवती पर्यटकांना बसण्यासाठी कट्टे बांधले गेले होते. चहुबाजूंनी विविध प्रकारची झाडे झुडपे होती, चारिही दिशेने हिरवळ नजरेस पडायची. तलावाच्या पश्चिम दिशेला डोंगराळ भाग आणि भव्य असे जंगल होते. डोगराळ भागात आदिवासी वस्ती होती. आदिवासी असले तरी राहणीमानात बरीच सुधारणा झाली होती. आदिवासी पाड्यात एक ग्राम देवतेचे मंदिर होते, काही पर्यटक तलाव फिरून झाल्यानंतर आदिवासी पाड्याला भेट देत. रम्य अशा या तासवनचा चौघंनाही विरंगुळा लागला होता.  
चौघेही तासवनात सकाळी ९ वाजता पोहोचले. सूर्याची कोवळी किरने तलावाच्या पाण्यावर पसरली होती.   
हवेत कमालीचा गारवा भरला होता. हिरवीगार झाड झुडप संतपणे वार्‍या सोबत डोलात होती. निरनिराळ्या पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. दूर कुठेतरी काही मानस शेकोटी करून बसली होती. हवाहवासा सुगंध वार्‍या सोबत दरवळत होता. शहराच्या धावपळीच्या जीवनापासून दूर येण्याचा सुखद असा आभास तिथल्या कनाकनात भरला होता.  
"चला थोडावेळ तलाव पाहु कट्यावर बसून, फार छान दृश्य आहे.", सतीश बोलला.   
चौघेही तलावा काठी कट्यावर बसले. जोसेफ ने त्याचा डिजिटल कॅमेरा आणला होता. कॅमेराने तो तलावचे फोटो काढत होता. चौघांनीही तिथे तास दीड तास वेळ आरामात बसून काढला. तलावाच्या एका काठाला काही लहान मुले खेळत होती. अचानक काहीतरी गडबड त्या दिशेला चालू झाली, काही क्षणातच माणसांची गर्दी त्याबाजुला जमा होऊ लागली. काही लहान मुले पाण्यात दगड मारीत होती.    
सतीश चे लक्ष तिकडे गेले. "ए प्रितीश, तिकडे काही तरी गडबड दिसते.", सतीश.   
"हो चल जाउन बघुया."   
चौघेही तळ्याच्या त्या बाजूला जाउ लागले. सतीश तिकडे जाता जाताच दुरून घटनेचा अंदाज घेऊ पाहत होता. पण निट्स काही कळत नव्हत. चौघेही काही क्षणात तिकडे पोहोचले. गर्दी फारच जमा झाली होती. सतीश गर्दी बाजू करीत पुढे गेला.   
तळ्याकाठी त्याने पाण्यात पहिले तर एक प्रचंड अजगर झुडपामधे अडकला होता. प्रितीश ने लहान मुलांना बाजूला केले. इतर काही मुले त्या अजगाराला काठीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते, पण अजगराच्या वजनामुळे ते शक्य होत नव्हते.   
विश्राम अजगराच्या थोडा जवळ गेला, नीट पाहिल्यावर त्याला कळले की अजगर एका दगडाखाली अडकला होता आणि झुडपाच्या गुंत्यामुळे त्याला बाहेर पडणे अशक्य होत होते. त्या ठिकाणापासून थोड्याशा अंतरावर काही स्त्रिया धून धुवत होत्या, गर्दी पाहून त्यासुधा त्या दिशेला आल्या आणि त्या अजगराला पाहून त्यांची तर बोबडीच वळाली.    
"झुडपामधे एका दगडखाली अजगराची शेपूट अडकली असावी, पाणीही गढूळ असल्याने निट्स काही समजत नाही", विश्राम.   
"आता त्याला बाहेर कसे काढायचे?", प्रितीश.   
"हं .... ! आधी त्या मुलांना सांग काठीने काही होणार नाही, आपल्यालाच काही केले पाहिजे.", सतीश बोलला.   
प्रितीश ने मुलांना थांबायला सांगितले. तशी मुले बाजूला झाली आणि पाहु लागली.   
"विश्राम तू माझ्या सोबत ये", सतीश.   
सतीश आणि विश्राम पुढे गेले. सतीश ने खिशातून रुमाल काढला.   
"आता मी हा रुमाल अलगद त्याच्या डोळ्यांवर टाकेन. त्याची हालचाल मंदावली की आपल्याला काळजी पूर्वक त्याची मान पकडली पाहिजे.", सतीश.   
"ठीक आहे.", विश्राम.   
सतीश ने अलगद रुमाल अजगराच्या डोळ्यांवर टाकला. दोघेही थोडा वेळ थांबले. त्याची हालचाल आता मंदावली होती.   
सतीश आणि विश्राम ने झटकन अजगरावर झडप घातली आणि त्याची मान पकडली. अजगर बराच शांत झाला होता.   
"प्रितीश आणि जोसेफ दोघेही या आणि दगड बाजूला करा.", सतीश.   
प्रितीश आणि जोसेफ पटकन त्यांच्या जवळ गेले आणि पाण्या खाली असलेला तो दगड बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागले.दगड झुडपा खाली असल्यामुळे प्रितीश आणि जोसेफ्ला खूप जोर लावावा लागत होता, आणि गढूळ पाण्याखाली अंदाज लागत नसल्यामुळे त्यांची दमछाक होत होती. थोड्या वेळाने तो दगड बाजूला झाला, सतीश ने अलगद अजगराला ओढले. तसा तो अजस्र असा जीव हळू हळू बाहेर येऊ लागला. बाहेर काढताना त्याची भव्यता नजरेत भरून राहत होती, विश्राम आणि सतीश दोघेही अजगराला बाहेर काढू लागले, उन्हाची झळ त्याच्या तुकतुकित कातडीवर पडत होती आणि त्या अजगराचे सर्वांग एखाद्या दागिण्यासारखे झळाळून उठत होते. बघ्यांची गर्दी तोंड आ वासून हे द्रुश्य बघत होते. चौघांनीही त्याला अखेरीस सुखरूप बाहेर काढले.   
सतीशने अजूनही त्याच्या डोळ्यावर रुमाल गच्च पकडून ठेवला होता. आणखी काही मुले मदतीला आली आणि त्या सर्वांनी त्याला काही वेळाने पुन्हा सुरक्षित जागा पाहून पाण्यात सोडून दिले.   
या सर्व घटनेत चौघंचीही चांगलीच दमछाक झाली होती. सुर्य डोक्यावर आला होता. उन सुधा फार लागत होते. चौघेही थोडावेळ आराम करण्यासाठी एका झाडाखाली आले आणि बसले.   
"यार चांगलाच थ्रिल अनुभवल आज आपण.",सतीश.   
"हो यार, पण खूप दमछाक झाली आहे आणि भूक पण खूप लागली आहे. चला जेऊण घेउया.", प्रितीश.   
"मी काही सॅंड्विचस आणली आहेत ते खाउन घेऊ आणखी काही खायचे असेल तर आदिवासी पाड्यात जाउ.", सतीश.
"अरे पाडा खूप लांब आहे यार, तोपर्यंत भूक मरून जाईल.", जोसेफ बोलला.  
"अरे गाडी आहे ना, पटकन जाउ आणि तोपर्यंत सॅंडविच आहे ना.", विश्राम.  
"ठीक आहे तसच करू." सतीश. 
चौघांनी सॅंड्विचस खाल्ली आणि आदिवासी पाड्यात जाण्यास निघाले. आदिवासी पाडा तलावाच्या पस्चिमेला डोंगराळ भागात होता. तिकडे जाण्याची वाट ही कच्च्या रस्त्याची होती. चौघेही गाडी घेऊन पाड्याला जायला निघाले. सतीश गाडी चालवत होता.  
भाग २
पाड्याला जाण्यासाठी प्रवेश शुल्क आकारण्यात यायचे. शुल्क भरून त्यांची गाडी हळू हळू पाड्याच्या दिशेला लागली. तलावापासून पाडा साधारण १५ कीलोमेटेर् च्या अंतरावर होता. रस्त्याच्या दुतर्फा निरनिराळी झाडे होती तशीच रानटी झुडपेही होती. अगदी कडक उन्हामधेही दाट सावली पसरली होती, एवढा झाडांचा विस्तार होता. अधून मधून काही माकडे दिसत, काही तर चक्क रस्त्यावर येऊन आपला जागेवरील मालकी हक्क दाखवित.    
गाडी लाल माती उडवत चालली होती. सतीशला पुढे काही अंतरावर रुंद रस्ता दिसला त्या ठिकाणी त्याने गाडी थांबवली.   
"काय रे गाडी का थांबवलीस?", जोसेफ.  
"झरा पहिलास का. खूप छान स्पॉट आहे. इथे काही फोटोज काढून जाउ मग पुढे काय बोल्तोस.", सतीश.  
"हा चला उतरुया.",विश्राम नेही दुजोरा दिला.  
चौघेही गाडीतून उतरले आणि झर्‍या जवळ गेले. अजु बाजूचा परिसर फारच शांत होता. कडक उन असूनही हवेत गारवा वाटत होता. क्वचितच एकादी गाडी अधून मधून येत जात होती. चौघांचा फोटो काढण्याचा कार्यक्रम चालला होता. अचानक सतीशला बाजूच्या झुडपात कसलितरि हालचाल जाणवली. सतीश सावध झाला.  
" शु ..... कसलितरि हालचाल होते आहे झुडपात.",सतीश.  
"अरे उंदीर असेल.",जोसेफ.  
"नाही रे, थांब.", सतीश हळू हळू झुडपाच्या दिशेने जाउ लागला. त्याने नीट निरखून पहिले तर एक छोटस वाघाच बछड तिथे भेदरलेल्या अवस्तेत बसल होत. त्याला पाहून सतीश च्या अंगावर शहरे उभे राहीले.   
"प्रितीश जोसेफ विश्राम, लवकर या इकडे..."  
चौघेही क्षणात तीकडे पोहोचले. बछडयाला  पाहताच चौघंचेही डोळे विस्फारले.  
"थांबा गडबड करू नका ती आधीच घाबरलेला दिसतोय.", सतीश बोलला.  
"अरे हे इकडे आल कस?", विश्राम.  
"काही कळत नाही." सतीश ने आजूबाजूला निरखून पहिले. काही मागमूस लागत नव्हता.  
त्या पिल्लाचे त्यांच्याकडे लक्श्य गेले, आणि ते अनीखीणच घाबरले. कॅव कॅव करत ते त्यांच्याकडे बघत होते.  
"हे नक्कीच आपल्या आई कडून दुरावले आहे.", सतीश.  
"हो पण आता आपण काय करायचे?", विश्राम.  
"मला वाटत आपण लगेच वन खात्यात कळविले पाहिजे.", जोसेफने सुचविले.  
"हो पण तोपर्यंत आपल्याला याच्यावर लक्ष्य ठेवले पाहिजे. जंगलातले इतर प्राणी किव्वा आदिवासी मुलांच्या हे नजरेत आल तर काय होईल सांगता येत नाही.", सतीश.  
"काय रे ते आपल्या जवळ येईल काय?", प्रितीश.  
"त्याची भीती पळवली तर नक्कीच येईल ", जोसेफ.  
"हो त्याला काहीतरी खायला देऊन पाहुया.", सतीश.  
सतीश गाडीकडे गेला. बॅग मधून त्याने बिस्किटाचा पुडा काढला. तो घेऊन तो तिकडे परत गेला. दोन तीन बिसकिटे काढून त्याने हातात घेतली आणि तो हळू हळू त्या बछड्या जवळ जाउ लागला. त्याला पुढे येताना बघून ते वाघाच पिल्लू घाबरले आणि जोरात ओरडु लागले. सतीश लगेच जागेवर थांबला आणि खाली बसून जमिनीवर थाप मारू लागला आणि त्याला आपल्यजवळ बोलाउ लागला. पिल्लू घाबरून ते बघत होता. प्रितीश मागून हाताने टिचक्या मारत त्याला बोलावण्याचा प्रयत्न करत होता तर जोसेफ आणि विश्राम शिळ घालून. चौघेही त्याचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत होते. अखेरीस पिल्ले थोडे निर्ढावले आणि शांत पने एक एक पाउल पुढे टाकत सतीश जवळ येऊ लागले. सतिष्णे त्याच्या जवळचे बिस्कट पुढे टाकले.  
त्याने ते हुंगले आणि म्याव म्याव करू लागले. सतिष्णे हळूच त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तेही त्याला प्रोत्साहन म्हणून मान आडवी तीडवि करू लागले. चौघांना त्याचा विश्वास संपादन करण्यात यश आले होते.  
"किती गोंडस दिसते रे हे.", विश्राम त्याच्या पाठीवरुन हात फिरवत बोलला.  
"हो फारच छान आहे, अगदी मांजराच्या पिल्लासारखेच चाळे करतोय.", जोसेफ.  
"प्रितीश वन खात्यात फोन करून कळवलेस का?", सतीशने विचारले.  
"हो त्यांना तासभर तरी लागेल असे बोलले ते.", प्रितीश.  
"ओके.", असे म्हणत सतिष्णे त्या पिल्लाला उचलून घेतले आणि जोसेफ ला फोटो काढण्यास सांगितले.  
जोसेफ त्यांचे फोटो काढू लागला. प्रत्येकाने पिला बरोबर फोटो काढून घेतले, त्याला घेऊन चौघेही गाडी जवळ आले आणि बसले.  
"एक महिन्याच असेल ना रे हे पिल्लू.", विश्राम.  
"हो जवळपास.",जोसेफ.  
चौघेही त्याला घेऊन वन खात्यातील कर्मचार्यांची वाट पाहत बसले होते आणि इतक्यात कसली तरी चाहूल लागली.  
"तुम्हाला काही आवाज येत आहे का रे?", जोसेफ ने विचारले.   
चौघेही सावध झाले. तो आवाज समोरच्या टेकडी वरुन येत होता. काही क्षणातच चौघंच्याही लक्षात आले की एक वाघीन  
हळू हळू टेकडी उतरत खाली येत होती. चौघंच्याही पाचावर धरण बसली. घाबरून ते चौघेही गाडीत बसले. पिल्लू सतीश च्या हाततच होते.  
वाघीन टेकडी उतरता उतरता आवाज देत होती. तिच्या आवाजात एक वेगळीयच आर्तता होती. जणू कोणाला तरी बोलावत असावी. चौघंनाही कळून चुकले होती की हे पिल्लू ह्याच वाघीनिच आहे. काही वेळातच वाघीन त्यांच्यापासून दहा फुटाच्या अंतरावर येऊन उभी राहिली. चौघांनी गाडीचा दरवाजा बंद केला होता. वाघीनीने परत तो आर्त आवाज दिला तसे ते वाघीणीचे पिल्लू चुळबूल करू लागले. वाघीन अतिशय शांत दिसत होती. तिच्या चेहृयावर एक कमालीची उदासीनता दिसत होती आणि थकवाही जाणवत होता.  
"आता काय करायचे?", प्रितिषणे घाबरून विचारले.  
"हे पिल्लू तिच्या स्वाधीन केले पाहिजे.", सतीश "मी हळूच गाडीचा दरवाजा उघडतो आणि याला सोडून देतो तिच्याकडे."  
"सांभाळून, ती आपल्यावर हल्ला तर नाही करणार ना?", जोसेफ.  
"माहीत नाही पण या पिल्लाला तरी तिच्याकडे सोडलेच पाहिजे." असे म्हणून सतिशने हळूच दरवाजा उघडून पिल्लाला खाली सोडले आणि दरवाजा लगेच बंद करून घेतला. वाघीणीचे लक्ष या सर्वाकडे होतेच. पिल्लू कॅव कॅव करीत त्याला आई जवळ पळाले. तिने त्याच आर्त आवाजात त्याला आपल्या कडे बोलाविले. त्याचे सर्वांग चाटून ती त्याचा लाड करू लागली. ते दृश्य अतिशय विलक्षण असे होते. चौघांनीही यापूर्वी कधीच असा अनुभव घेतला नव्हता. गाडीत बसून ते हे सर्व दृश्य पाहत होते. जोसेफ गाडीतून या सर्व घटनेचे फोटो घेत होता.  
"आज असा काही अनुभवायला मिळेल असे वाटले नव्हते यार. इट्स वेरी थ्रिलिंग.", विश्राम.  
"माझ्यातर सर्वांगावर शहारे उभे राहीले आहेत.", सतीश.  
वाघीन त्या पिल्लाला घेऊन तिथेच बसून राहिली होती. तिच्याकडे बघून जाणवत होते की ती फार थकली होती. कदाचित पिल्लाला शोधण्यासाठी ती बरीच भटकली असावी. तिला आता आरामाची गरज होती. पण इतक्यताच हे सर्व नाटय संपणार नव्हते. पुढे काय होणार होते याचा विचार ही चौघंना शिवला नसेल.  

"सतीश मला वाटत आपण आता इथून जाउ शकतो.", जोसेफ.  
"हो, प्रितीश तू वन खात्यात फोन कर आणि सांग इथे येण्याची आता गरज नाही. त्या पिल्लाला त्याची आई भेटली आहे आणि ते तिच्याकडे सुरक्षित आहे.", सतिशने प्रितीश ला सांगितले.  
 सतीश गाडी चालू करणार इतक्यात...  
"सतीश, ओ माय गॉड...ते .. ते... तिकडे बघ", विश्राम ओरडला. त्याचे डोळे विस्फारले होते आणि तो टेकडी च्या टोकाकडे पाहत होता.  
चौघांनीही टेकडीच्या दिशेने पहिले आणि त्यांची बोबडीच वळली एक भला मोठा वाघ त्यांच्या दिशेने येत होता. पुढे काय घडणार होते याचा चौघंनाही काहीच अंदाज नव्हता. चौघंचीही पाचावर धारण बसली होती, पूर्ण शरीर स्तब्ध झाले होते, अंगावर सरसरुन  काटा आला होता, दरदरुण घाम फुटू लागला.  
वाघीनीला चाहूल लागली, तशी ती त्या दिशेने पाहून गुर्गुरु लागली. ती बसल्या जागेवरून उठली. पिल्लू तिच्या मागे सुस्त होऊन बसले होते. वाघिणीचे पिलाकडे लक्ष होते. तिने त्याला अलगद आपल्या तोंडाने उचलले आणि बाजूच्या एका मोठ्या झाडाखाली घेऊन गेली. तो वाघ हळू हळू त्याच्या दिशेने चाल करून येत होता. वाघीन सावध झाली होती. पण तिच्या हालचालीत अस्वस्थता जाणवत होती. ती कधी आपल्या पिलाकडे तर कधी चाल करून येणार्‍या वाघाकडे पाहत होती.   
वाघ आता तिच्या पासून दहा फुटाच्या अंतरावर येऊन उभा राहिला होता. गूर गूर करीत तो वाघीनिकडे पाहत होता. वाघीनीने आस्फ्यूटशी डरकाळी फोडली. वाघ कधी डावीकडे तर कधी उजवीकडे फेर्‍या मारत होता. वाघीन जागेवरून हलत नव्हती, पिल्लू तिच्या मगेच होते, कदाचित त्यालाही आल्या संकटची जाणीव झाली असावी म्हणून ते गपचुप आपल्या आईच्या मागे भेदारलया सारखे बसून राहीले होते.  
सतीश आणि त्याचे मित्र हे सर्व नाट्य जीव मुठीत घेऊन बघत होते. सतीश चे हृदय जोरजोरात धडधडत होते. त्याच्या माथ्यावरून घामाचे थेंब ओघळत होते. श्वास जड होत होता.  
"वाघीन तिच्या पिल्लाला वाचवू शकेल काय रे?", जोसेफ.  
"नक्कीच वाचवणार, अगदी स्वताच्या जीवाची पर्वा न करता ती तिच्या पिल्लाचे संरक्षण करेल.", सतीश.  
इतक्यात वाघाची भयानक डरकाळी ऐकू आली. वाघ वाघीणीवर चाल करून गेला होता. त्याने त्याचा मजबूत पंजा वघीणीवर उगारला आणि झटक्यात वाघीणीला खाली जमिनीवर पाडले. वाघीनीच्या माथ्यावर खोल जखम झाली आणि रक्त ओघलू लागले होते. तिचे पिल्लू कॅव कॅव करू लागले, वाघ पिलाच्या दिशेने जाउ लागला आणि वाघीनीने उठून मागून वाघाचा पाय तोंडाने जोरात पकडला तसा वाघ मागे वळला आणि तिला पन्ज्याने एक फटका दिला पण ती आता हार मानणार नव्हती तिनेही आपल्या पन्ज्याने त्याच्या डोळ्यांवर वार केला, प्राण पणाला लावून ती वाघाशी लढा देत होती. वाघाचा एक डोळा घायाळ झाला होता पण इतक्यात त्याने हार मानली नव्हती. वाघ बाजूला झाला, थोडावेळ परत डावीकडे तर कधी उजवीकडे अशा फेर्‍या मारू लागला. वाघीन डरकाळी फोडत होती, जणू त्याला शिव्याशाप देऊन तिथून निघून जायला सांगत होती ती. काही वेळ गेला आणि अचानक वाघाने उंच अशी उडी घेत वघीनी वर चाल केली, वाघीन सावध होतीच तिनेही सळसळत्या अंगाने दोन्ही पंजे उगारले आणि वाघाच्या पोटाचा घाव घेतला. वाघ बाजूला घायाळ होऊन पडला. त्याच्या पोटात आणि पायात बरीच मोठी जखम झाली होती. थोडावेळ वाघ त्याच जागेवर पडून राहिला, वाघीन विजयी डरकाळी फोडत होती. वाघ आता बराच नमला होता. तो हळुचा तिथून उठला आणि टेकडीच्या दिशेने परत जाउ लागला, त्याला परत जाताना पाहून वाघीन शांत झाली. ती आपल्या पिला जवळ आली. पिल्लू तिला बिलगले. ती तिच्या पिल्लाला घेऊन टेकदीच्या विरूढ दिशेने हळू हळू जाउ लागली.  
    एका आईचा विजय झाला होता. तिच्या पिलाचे तिने प्राण पणाला लाउन संरक्षण केले होते आणि हे संपूर्ण थरार नाट्य चौघांनी आपल्या डोळ्यांनी पहिले होते. चौघांचाही जीव भांड्यात पडला. जोसेफने तर ही संपूर्ण घटना त्याच्या कॅमेराने रेकॉर्ड करून घेतली होती.  
"हे जे काही घडले आहे ते मी कधीच विसरू शकणार नाही.", प्रितीश.  
"मी तर कधी विचार ही केला नव्हता की असे काही मला डोळ्यांनी पाहायला मिळेल.", विश्राम.  
"सतीश.. सतीश.. अरे ए सतीश कुठे हरवलास." जोसेफ सतिश्ला बोलावत होता.  
सतीश ने गाडीचा दरवाजा उघडला आणि बाहेर येऊन उभा राहिला. काळ अगदी स्तब्ध झाला होता. ह्र्यदायत साठवलेल्या काही कटू आठवणी बाहेर येऊ पाहत होत्या. डोळ्यात अश्रू दाटले होते.
  भाग ३ 

"सतीश बाळा, मावशीच पैस द्याच रहायल्यात तेवढ देउन येतोस का?", सतीशच्या आईने त्याला विचारले. 
" जातो आई.", सतीश.  
सतीश सात आठ वर्षाचा असेल. तो त्याची आई आणि त्याचे वडील असे कुटुंब एका लहानश्या घरात राहत होते. परिस्थिती अतिशय हलाकीची होती. सतीश ला एक छोटी बहिणी ही होती पण वयाच्या तिसर्या चौथ्या वर्षीच तिचे एका आजाराने निधन झाले होते. त्याची आई दुसर्या घरची धुनी भांडी करून थोड थोडके पैसे मिळवत होती पण तेवढ्या पैशात घरच्या गरजा भागत नव्हत्या आणि सतीश चा बाप दारूच्या अधीन होऊन घरची अगदी नासाडी करत होता. घराशी त्याचा संबंध फक्त पैस्या पुरता उरला होता.   
"पारू ए पारे, भायेर ये.", सतीश चा बाप दारातून ओरडत होता.  
"आला वाटत तुजा बा, बाळा हे पैसे घे पटकन आणि जणाक्का कडे जा तिला हे पैसे देऊन ये नाहीतर तुजा बा हे पैसे पण फुकेल दारू वर."  
सतीशच्या आईने पैसे त्याच्या जवळ दिले आणि सतीश बाहेर येऊ लागला. तेवढ्यात त्याचा बाप त्याच्या समोर येऊन उभा राहिला. त्याचे राकट लाल लाल डोळे सतीशवर रोखले होते. सतीश पैसे मुठीत घेऊन उभा होता.  
"ए.. पैसे दे इकड."  
"न्हाई देणार मावशीला द्यायचे हायेत हे पैसे."  
"ए भाड्या.. बापाला दम दावतोस व्हाय. आन् इकड ते पैस." असे म्हणत त्याने सतिष्चया हाताला हिसाडा दिला तशी त्याची आई आतून बाहेर आली.  
"आव अस काय करता, जणक्काचे पैस उधार घेतले होते ते तिला परत केल पायजेत. घरात अन्नाचा कन नस्तोय आणि तुमि पैस अस दारू वर उडवता, निदान पोराच्या पोटचा तरी इचार करा" सतिष्ची आई गया वया करत बोलत होती.  
"ए तू मला शिकवू नगस मला दारू प्याचि हाय, दे ते पेस इकड.", अस म्हणत तो सतिष्चया आई वर खेकसला.  
  डोक्यात चोवीस तास दारूची ज़िंग असलेल्या त्याला पैसे दिसले की फक्त दारूच आठवायची. घर, बायको पोर हे सर्व त्याच्या लेखी आता काहीच उरले नव्हते, दारू पिऊन घरी यायचे आणि बायका पोरांना मन भारेस्तॉवर मारायचे हा एकाच धंदा होता त्याला.   
त्याने सतिष्चा हात पकडला आणि पैसे काढून घेऊ लागला पण सतीश ने पैसे आपल्या मुठीत घट्ट पकडून ठेवले होते.  
सतीश पैसे सोडत नव्हता हे पाहून त्याच्या बापाला अजुन राग आला तो सतीशला पाठीत जोरजोरात मारू लागला. सतीश ओरडत होता. हे पाहून त्याची आई मधे पडली.  
"सोडा त्याला, कशाला मारताय लेकरला त्या दारूपायी, सत्यानाश केला त्या दारुन माझा."  
सतिष्ची आई ने त्याच्या बापाचा हात पकडला हे पाहून त्याच्या डोळ्यात आग उतरली त्याने तिचा गळा पकडला. त्याचा राग अनावर झाला होता. शिवीगाळ करीत तो तिला मारू लागला. सतीश रडत होता.   
"सतीश बाळा पळ, बाहेर जा, मावशिकडे जा, जा बाळा लवकर जा." आई रडत भेकत सांगत होती आणि त्याचा बाप तिला मारत होता. सतिश्ला हे सर्व असह्य झाल, तो पुढे आला आणि त्याने त्याच्या पायाचा कडकडून चावा घेतला. तो ओरडला आणि बाजूला झाला. त्याची आई धडपडत उठली त्याला घेऊन घरा बाहेर आली. ती सतिश्ला घेऊन जणाक्का कडे निघाली.  
सतीश आणि त्याची आई जणाक्काच्या दारात आले. बाहेरून सतिष्चया आईने जणाक्काला आवाज दिला. जणाक्का बाहेर आली. तिने सतिष्चया आईचा अवतार बघितला आणि काय झाले असेल ते तिच्या लक्षात आले. ती तिच्या जवळ आली.  
"काय हे तुझ्या नशिबी आलय पारू."  
"आता सहन नाही होत आक्का, मी हे घर सोडून निघाले माझ्या सतीशला घेऊन.", सतीशची आई रडत बोलत होती.  
"अग पण पारू तू अशी आणि हे एवडस पोर घेऊन जाणार कूट, माझ ऐक असा संसार मोडून जाउ नगस. ये आत ये बघू आधी." जणाक्का सतीश आणि त्याच्या आईला घरात घेऊन जाउ लागली तेवढ्यात सतीशचा बाप तिथे आला.  
"ए तिला आत घ्यायच न्हाई, माज पैस द्याला सांग आधी आणि मग घरात घेऊन बस खुशाल."  
"आरे का असा बायका पोरांच्या जिवावर उठलायस, दारू दारू करून पार वाट लावलीस घराची. तीन राब राब दिसभर राबायाच आणि तू तिच्या मेहनतीच पैस अस दारू वर उडवायचस. तुला लाज कशी वाटत न्हाय मी म्हणते." जणाक्का रागच्या भरात तावातावाने बोलत होती पण त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. तो पारुजवळ आला आणि तिझा हात पकडून ओढत न्हेउ लागला. सतीश रडत उभा होता. हातात घट्ट पकडलेले पैसे अजूनही तशेच त्याच्या हातात होते.  
जणाक्काचा नव्हारा तानाजी घराकडे आला, दुरून येता येताच त्याच्या लक्षात हा प्रकार आला होता. त्याने सतीशच्या बापाचा हात पकडला. आणि एका हिस्क्यात त्याला दूर लोटले.  
"काय रे ये भाडखाउ लैई माज आलाय तुला, साला रोजचा तमाशा लावलाय ह्यान, काम न्हाई का धंदा न्हाई नुसट दीसभर दारू पयाच आणि भांडण करायची, बायका पोरासनी मारायाच. थांब तुला पोलिसांच्याच हवाली करतो आता" तानाजी.  
"ए तान्या तुला आमच्या मधि यायच कारण न्हाई, गपगुमान तुझ्या घराला जा."  
मार आणि शिव्यशप खाउन्हि त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता.  
तो उठला धडपडत सतइष्कडे येऊ लागला. सतिशकडे पैसे आहेत हे त्याच्या लक्षात होते. सतीश घाबरला मागे सरकू लागला. कदाचित तो विसरला ही होता की त्याच्या हातात पैसे आहेत. बापाचा असा अवतार बघून तो पूर्णपणे गर्भगलित झाला होता. तो सतिष्चया जवळ आला आणि त्याला मारणार इतक्यात मागून त्याच्या डोक्यात घाव बसला. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. सतीश त्याच्या कडे बघत होता, तो बेशूध होऊन खाली पडला आणि मागे त्याची आई हातात दगड घेऊन उभी होती. आईचा हा अवतार त्याने पहिल्यांदाच बघितला होता. तो घाबरून आईला बिलगला.   
त्याची आई रडत होती. खाली पडलेल्या तिच्या नवऱ्याच्या बाजूला ती बसली.  
"आतापर्यंत याला कधीच उलटूनही बोलले नव्हते. कसबस दिस काढत होते. पोटाला चिमटे घेऊन माझ्या पोरांची आणि ह्याच पोट भरत होते. सगळ सहन केल मी, ह्याच दारू पीण, मारहाण, मनस्ताप सगळ सगळ... चार वर्षाची होती माझी सई. माझ्या पोटाचा गोळा.   
माझी पोरगी तापानं फन्फनत होती. तिच्या दव्याचे पैस पण सोडल न्हाईत या नराधमान . ह्यान खाल्ली माझ्या पोरीला, ह्यान मारल तिला..." तिचा राग, द्वेष, मनस्ताप सर्वाचा आज उद्रेक झाला होता. हृदयात काटा रुतुन तिथेच मोडून पडावा अशी अवस्था तिची झाली होती आणि सर्व काही संपल होत. सतीश आणि आई दोघे गाव सोडून निघून गेले. तो वाचला की मेला हे सुधा त्यांना माहीत नाही.  

    सूर्य मवळतीला लागला होता. आपला भूतकाळ अशा रीतीने डोळ्यासमोर येईल असे सतिश्ला वाटले नव्हते. त्याच्या डोळ्यात अश्रू भरून आले होते. त्याने त्याच्या पैशाच पाकीट हातात घेतले. एक दहा रुपयाची जुनी नोट बाहेर काढली आणि डोळ्यासमोर धरली. .